पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरास तेल्हारा येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




अकोला, दि.२९(जिमाका)-  तेल्हारा तहसील कार्यालय, एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विदयमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिवीर भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे शनिवारी (दि.२७)उत्साहात संपन्न झाले. याशिबिरास तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

            दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे हस्ते उद्घाटन झाले.अध्यक्षस्थानी प्रभारी तहसिलदार राजेश गुरव होते. बालकल्याण समिती अकोला च्या अध्यक्ष प्रांजली जैस्वाल, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली बोदडे या उपस्थित होत्या.  प्रास्ताविक अभय केंद्राचे अतुल चव्हाण यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, एन्करेज फाउंडेशन, कृषी विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र तेल्हारा, संजय गांधी योजना विभाग, पंचायत समिती, अंगणवाडी प्रकल्प दहीगाव, एकात्मीक बाल विकास प्रकल्प तेल्हारा, महिला समुपदेशन केंद्र, तालुका विधी सेवा प्राधिकरण इत्यादी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. सूत्र संचालन दामोदर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिश राठोड यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी मंगेश राउत, वसंता टोहरे, मारोती कडू तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तेल्हारा, अभय केंद्र तेल्हारा व तहसील कार्यालय तेल्हारांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ