जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशःसंचारबंदी निर्बंधात अंशतः बदल

            अकोला,दि.20(जिमाका)- शहरातील चार पोलीस स्टेशन्सच्या हद्दीत दि.13 मे पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले आहेत.

आदेशात नमूद केल्यानुसार,

१.      डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेले जमावबंदी व संचारबंदिचे आदेश  (दि.15 मे 2023 रोजीचे)  हटविण्यात येत आहे. 

२.      जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करुन दि.15 मे पासून सायं. 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दि.15 चे रात्री 8 ते दि.16 चे सकाळी 8 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दि.16 पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 8 संचारबंदी लागू करण्याचे आदेश (दि.15 मे 2023 रोजीचे) कायम ठेवण्‍यात आले आहे.

जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ