बाळापूर येथे आज (दि.९) छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर

 


 अकोला,दि.८(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथे मंगळवार दि. ९ रोजी सकाळी १० वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे, असे प्राचार्य एस.आर. ठोकरे यांनी कळविले आहे. या शिबिरात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे सकाळी १० वा. उद्घाटन होईल. उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.व्ही. चोपडे, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग द. ल. ठाकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात पंकज पाटील, अभय पाटील, विशाल नंदागवळी, निलेश देशमुख हे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

             त्यात इयत्ता १० वी नंतरचे अभ्यासक्रम आणि रोजगार संधी, इयत्ता १२ वी नंतरचे अभ्यासक्रम आणि रोजगार संधी, व्यक्तिमत्व विकास, आयटीआय प्रवेश व व्यवसाय तसेच प्रशिक्षणांतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना याबाबत माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.  या शिबिराचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन बाळापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे व पातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष भगत यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ