जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी



अकोला,दि.12(जिमाका)-  जलसंवर्धन व जलजागृती संदर्भात लोकसहभाग वाढवा यासाठी भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात प्रचाररथाव्दारे जलजागृती करण्यात येणार आहे. या प्रचाररथाला विधानपरिषदचे आमदार वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

राज्यशासनाव्दारे जलयुक्त शिवार तसेच केंद्र शासनामार्फत जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून जलसंधारण कामे राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती प्रचार रथाव्दारे जिल्हा व ग्रामीण भागात फिरणार आहेत. यावेळी जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपअभीयंता गिरी, बीजेएसचे जिल्हा प्रमुख सुभाष गादिया, जिल्हाध्यक्ष किशोर बोथरा, महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख अशोक पवार, विदर्भ समन्वयक नितीन राजवैद्य, जिल्हासमन्वयक संदीप पाईकराव, दीपक जैन, प्राचार्य जयंत बोबडे, विजय चौधरी, अमरीश पारेख, संजीव जैन, शीतल जैन, ममता जैन आदि उपस्थित होते.

तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी अर्ज करा-जलसंधारण विभागाचे आवाहन

देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून पाण्याचे काटकसरीने वापर करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. हवामानाच्या बदलामुळे पाऊस बेभरवशाचे झाले आहे. तसेच तलावांमध्ये गाळ निरंतर साचत असतो, या संकटाला सामोरे जायचे असेल तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम करणे, परिसरातील पाणीसाठ्याची खोलीकरण, रुंदीकरणातून गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे, त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे व पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वाटप नियोजन करणे आवश्यक आहे. ही कामे किंवा जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेल्या ग्रामपंचायतीकडून मागणी अर्ज मागविण्यात येत आहे. याकरिता https://bjsindia.org/mwsd या लिंकवर अर्ज करावा. नमुन्याप्रमाणे सरपंच, ग्रामसेवक यांच्या सही व शिक्का सहित ग्रामपंचायतच्या लेटरहेडवर अर्ज पूर्णपणे भरून अपलोड करावे, असे आवाहन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ