मधमाशी पालकांना पुरस्कार; मध उत्पादक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविले

 


अकोला,दि.३(जिमाका)- मधसंचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर जि. सातारा येथे दि.२० मे रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशापालन उद्योगात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मधमाशी मित्र पुरस्कार दिला जातो. मधमाशी उद्योगात सातेरी, मेलिफेरा, आग्या अशा मधमाश्यांचे संगोपन करुन मधाचे उत्पादन  घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी  आपले अर्ज पाठवावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अकोला यांनी केले आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महसूल कॉलनी, सरकारी आयटीआय समोर अकोला येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती एन.टी.लवाळे व तांत्रिक आर.एम. बिलबिले यांच्याशी दूरध्वनी ०७२४-२४१४२५० अथवा मोबाईल क्रमांक ८४३२९८९१२३ वर संपर्क साधावा.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ