मुर्तिजापूर येथे बुधवारी(दि.17) छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर


अकोला,दि.9(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुर्तिजापूर येथे बुधवार दि. 17 मे रोजी सकाळी 10 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते होईल. या शिबिरात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण, नोकरी, रोजगार व कर्ज याबाबत माहिती तसेच स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.  या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एस.पी. भगत यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना