जवाहर नवोदय विद्यालय; ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

 अकोला, दि.२५(जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव जि. अकोला येथे इयत्ता ११ वी विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्राचार्य आर.एस.चंदनशिव यांनी केले आहे. 

अकोला जिल्ह्यातील सन २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या  शासनमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१० पासून सुरु झाली आहे.  जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय असून सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविला जातो. स्पर्धा परीक्षा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, संगणक शिक्षण देऊन विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास केला जातो.

अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in  किंवा https://cbseitms.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी.  ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे असून अखिल भारतीयस्तरावर २२ जुलै २०२३ रोजी प्रवेश परीक्षा होईल, याची नोंद पालक व मुख्याध्यापकांनी घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य आर.एस.चंदनशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव जि. अकोला येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ०७२४-२९९१०८७.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ