आपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण

 



अकोला, दि.२६(जिमाका)- अकोला, बार्शीटाकली, पातूर, मूर्तिजापूर तालुक्यातील महसूल, पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था , सरपंच, पोलिस पाटील ,शोध व बचाव कार्य करणारे स्थानिक नागरिक यांच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे पूरस्थिती हाताळणी बाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आज काटेपूर्णा प्रकल्प येथे पार पडले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने हे प्रशिक्षण दिले.

           या प्रशिक्षणास राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार्शीटाकली तहसिलदार दीपक बाजड, नायब तहसिलदार एस. पी. ढवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुनील कल्ले, हरिहर निमकंडे, मंडळ अधिकारी के.डी.कदम, श्रवण भराडी, प्रा. सुधीर कोहचाळे, एस.व्ही.पाटील, वंदे मातरम पथक कुरणखेड, एकलव्य आपत्कालीन पथक पोपटखेड ,संत गाडगेबाबा आपतकालीन पथक पिंजर, मा.चंडिका आपत्कालीन पथक पैलपाडा,  तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, होमगार्ड,दीपक सदाफळे, उमेश आटोटे, मनीष मेश्राम, रणजीत घोगरे ,नजर अली आदी उपस्थित होते.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ