क्रीडा शिक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण: 80 शिक्षकांनी घेतला सहभाग


अकोला,दि.13(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 ते 10 मे 2023 कालावधीत स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे जिल्हा क्रीडा शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले. या शिबीरांमध्ये 80 क्रीडा शिक्षकांना विविध क्रीडा विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार, प्रसार व जोपासना होण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षकांना माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 80 शारीरिक शिक्षकांनी सहभाग घेतला. शिबीर दोन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राणायाम, प्रात्याक्षिके, क्रीडा विषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सतीशचंद्र भट(बॉक्सींग), सागर देशमुख(मैदानी), अनिल कांबळे(कुस्ती), शिवाजी चव्हाण, कुंदन लहाने, सौम्य लोढा(तायक्वांदो), सईद खान(फुटबॉल), मिलींद लांडे(कबड्डी), दिपक सदाशिव(जलतरण) गौरव ढवाक(सॉप्टबॉल) व शरद पवार(जिम्नॅस्टिक) इत्यादीनी मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा शिक्षकांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन करण्यात आले. तर मनोरंजनपर कार्यक्रमात क्रीडा शिक्षकांनी गीत गायन नृत्य अभिनय, कविता वाचन इत्यादीचे सादरीकरण करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक व शिबीर प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भेट, मनिषा ठाकरे, महेश पवार, प्रशांत खापरकर, दिपक व्यवहारे, राजू उगवेकर, मास्टर ट्रेनर बबलू तायडे, रामेश्वर राठोड, मयुर निबांळकर आदि  उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ