पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान; तालुक्यास्तरावर शिबीराचे आयोजन करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश


अकोला,दि. 18 (जिमाका)-  "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान" शिबीर कार्यक्रम दि. 22 ते 30 मे 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले. या कालावधीत सर्व प्रशासकीय विभागाने समन्वय साधून तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करा, निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

 समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणींचा शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरावर "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान" शिबीराचे आयोजन केले आहे.

शिबीर याप्रमाणे : सोमवार दि. 22 मे रोजी अकोला ग्रामीण, मंगळवार दि. 23 रोजी अकोट, बुधवार दि. 24 रोजी तेल्हारा, गुरुवार दि. 25 मे रोजी बार्शीटाकळी, शुक्रवार दि. 26 मे रोजी बाळापूर, सोमवार दि. 29 मे रोजी मुर्तिजापूर व मंगळवार दि. 30 मे रोजी पातुर या तालुक्याच्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांचे प्रश्न, अडचणी व तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये संबंधित तालुक्यातील अंगणवाडी सेविका/अशा वर्कर्स यांच्यामार्फत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करुन त्यांच्या तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या शिबीराच्या दिनांकास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ