जिल्‍हास्तरीय काम वाटप समिती ; गुरुवारी (दि.1 जून) बैठक


           अकोला, दि.22(जिमाका)- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना तीन लाख रुपये मर्यादेच्या आतील कामांचे वाटप करण्याकरिता अध्यक्ष, जिल्‍हा काम वाटप समिती तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद अकोला यांचे अध्‍यक्षेतेखाली गुरुवार दि. 1 जून रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद अकोला यांचे दालनात ही बैठक होणार आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे दुचाकी, चारचाकी वाहनांकरिता वाहनतळ,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे तीन अर्धवेळ कंत्राटी सफाईगार पुरविणे व  शासकीय तंत्र माध्यमिक शाळा तथा औद्योगिक शाळा अकोला येथे दोन अर्धवेळ कंत्राटी सफाईगार कामगार पुरविणे हे प्रस्तावित कामे शासन निर्णयान्‍वये तीन लाख रुपयांच्या आतील कामाचे वाटप करण्‍यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्‍थांनी प्रस्तावित काम करण्‍यास इच्‍छूक तसेच जिल्‍हा काम वाटप समितीच्‍या अटी व शर्तीनुसार पात्र असल्‍यास आपले प्रस्ताव व संमतीपत्रासह आणावे व बैठकीस हजर राहावे, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ