छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरात आज (दि.12) युवकांना होणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन



अकोला,दि.11(जिमाका)- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 12 मे रोजी सकाळी 10 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ मान्यवर युवक युवतींना  समुपदेशन, रोजगारांच्या संधी, नवीन तंत्रज्ञान व करिअर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. शिबीराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

            याप्रसंगी खासदार संजय धोत्रे, विधानपरिषद  सदस्य आमदार अमोल मिटकरी, किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, विधानसभा सदस्य आमदार गोवर्धन शर्मा व रणधीर सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुचेता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचीही उपस्थित राहणार आहे. या शिबिरात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे डॉ. ज्ञानसागर भोकरे, राष्ट्रमाता करिअर कॉन्सिलिंग केंद्राचे संचालक गजानन कोरे व अस्पायर इंस्टीटयुट ऑफ ह्युमन डेव्हलमेंटचे संचालक सचिन बुरघाटे हे तज्ज्ञ युवक युवतींना मार्गदर्शन करतील.

             त्यात इयत्ता 10 व 12 वी नंतरचे अभ्यासक्रम, सीईटी व इयत्ता 12 वी नंतरचे विविध अभ्यासक्रम आणि रोजगार संधी, व्यक्तिमत्व विकास, आयटीआय प्रवेश व व्यवसाय, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण रोजगार संधी याबाबत माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.  या शिबिराचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ