पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; जिल्हाधिकारी कार्यालयात दि.26 रोजी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया



अकोला,दि.23(जिमाका)- पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवार दि. 26 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी   संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

मेळाव्यात सहभागी उद्योजक,पदांचा तपशील व पात्रता निकष याप्रमाणे-

एडीएम जाईनफ्लेक्स इंडिया प्रा.लि. मालुंगे चाकण, पुणे येथे 125 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये अकुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी व बारावी पास (वयोमर्यादा-18 ते 30), अकुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय कोणताही ट्रेड (वयोमर्यादा-18 ते 30), कुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: कोणताही शाखेचा पदवीधर (वयोमर्यादा-21 ते 30), अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय कोणताही ट्रेड(वयोमर्यादा-18 ते 30) व अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: कोणताही शोखेचा पदवीधर(वयोमर्यादा-21 ते 30).

हा रोजगार मेळावा शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व  इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ