म्हैसवर्गीय जनावरांचा बुधवारी(दि.24) जाहिर लिलाव


अकोला,दि. 19 (जिमाका)-  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,कृषिनगर, अकोला येथील पुर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र येथे बुधवार दि. 24 मे  रोजी सकाळी 10 वाजता निवडक म्हैस वर्गीय जनावरांचा जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. जनावरे पाळण्यास इच्छुक पशुपालक व शेतकरी यांनी आपला सातबारा उतारा व आधार कार्डची प्रत सादर करुन या लिलावात सहभागी होऊ शकता. तसेच शेतकरी व पशुपालक, दुग्धव्यावसायिक यांनी लिलावात सक्रिय सहभाग घ्यावा. लिलावा संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. दिलीप बदुकले (9552794560) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ