बार्शीटाकळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर




अकोला,दि.३१(जिमाका)- तहसील कार्यालय, पंचायत समिती व एकात्मक बालविकास सेवा योजना प्रकल्प  यांच्या संयुक्त विदयमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२९) पंचायत समिती बार्शीटाकळीच्या सभागृहामध्ये हे शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन मुर्तीजापुर मतदार संघाचे आ. हरीष पिंपळे यांनी दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. सभापती श्रीमती सुनंदाताई मानतकर, जि प. सदस्य गणेश बोबडे, रायसींगजी राठोड, उपसभापती संदीप चौधरी, सदस्य श्रीमती संगीताताई जाधव,गणेश झळके, गजानन मानतकर, तहसिलदार दीपक बाजड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले.  या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स शासकीय विभागांनी लावले होते. गटविकास अधिकारी कालीदास तापी, सहायक गटविकास अधिकारी श्रीमती सुनिता इंगळे यांचीही उपस्थिती होती. महिला आर्थिक विकास महामंडळ लोक संचालीत साधन केंद्र उमेद कृषी विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, संजय गांधी योजना विभाग, पंचायत समिती, एकात्मीक बाल विकास प्रकल्प बार्शीटाकळी, तालुका विधी सेवा प्राधिकरण महिला व बालविकास विभागा अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र बार्शी टाकळी चाईल्ड लाईन इत्यादी विभागांची आपले स्टॉल्स लावले होते. शिबिरामध्ये एकुण ३६ तकारी प्राप्त झाल्या त्यातील ९ तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरीत २७ तक्रारी संबंधीत विभागांना अग्रेषित करण्यात आल्या.सुत्र संचालन सतिश राठोड यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मेघा मांडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश खांडेकर,सुनंदाताई नाहाटे, शत्रुघ्न वानखडे, श्रीमती मनिषा निवांग, श्रीमती अर्चना मानकर, योगेंद्र खंडारे,तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ