छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर मंगळवारी (दि.३०)


अकोला, दि.२६(जिमाका)-
   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला यांच्यावतीने  छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन मंगळवार दि.३० रोजी सकाळी १० वाजता प्रमिलाताई ओक हॉल, नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला येथील प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

                  राज्याचे कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतुन १०  वी, १२ वी  नंतर शिक्षणाच्या पुढील संधी, पदवी पदविकेनंतर पुढील शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तीमत्व विकास याबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी  राज्यातील  प्रत्येक मतदार संघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवार दि.३० रोजी सकाळी १० वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने करतील. या कार्यक्रमास  खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, आमदार  किरण सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल,आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा सदस्य, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे, संस्था व्यवस्थापन समिती औ.प्र.संस्था मुलींची अकोला अध्यक्ष जयंत पडगीलवार श्री.शिवाजी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, संचालक प्रभात किडस डॉ. गजानन नारे,सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार,  उद्योजकता व नाविन्यता विभाग द. ल. ठाकरे उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुनिल बिहाडे,प्रा. संजय पाटील C.O.E.T. अकोला प्रा.डॉ.योगेश वडतकर सरस्वती कला महाविदयालय दहीहांडा  उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य श्री.शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ