शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार;सोमवारपर्यंत हरकती मागविल्या


अकोला,दि. 17 (जिमाका)-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्य पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कारार्थीची यादी  संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासंदर्भात आक्षेप किंवा हरकती असल्यास सोमवार दि. 22 मेपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंर्तगत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा परस्कार, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते राज्य पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कारार्थीची यादी  संचालनालयाच्या  https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील पुरस्कार टॅबमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. या संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास संचालनालयाच्या संकेतस्थळावर सादर करुन विहित नमूना संकेतस्थळावर भेट देऊन डाऊनलोड करुन घ्यावा. तसेच विहित कालावधीत प्राप्त होणाऱ्या  हरकती यांचा विचार करण्यात येईल,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ