तेल्हारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर


अकोला, दि.23(जिमाका)-  तेल्हारा तहसिल कार्यालय व एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन बुधवार दि. 24 मे रोजी सकाळी 10 वाजता भागवत मंगल कार्यालय, तेल्हारा येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली बोदडे यांनी केले.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणींचा शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरावर "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान" शिबीराचे आयोजन केले आहे.

या शिबीरात महसुल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन,नगरपंचायत, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, एकात्मीक बालविकास सेवा योजना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महीला आर्थीक विकास महामंडळ, तालुका विधी सेवा प्राधिकरण, सखी वन स्टॉप सेंटर, महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कौटुंबिक हिंसाचार अधिनीयम व इतर विविध विभागाचे स्टॉल राहणार असुन या विभागांचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली बोदडे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ