पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा:१०२ उमेदवारांची प्राथमिक निवड

 





अकोला, दि.२६(जिमाका)-  पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास २१९ उमेदवारांनी हजेरी लावली व मुलाखत दिली. त्यातील १०२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी  दिली आहे.

जिल्हाप्रशासनाच्या वतीने दर महिन्याला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आज आयोजित मेळाव्यात २१९ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील १०२ उमेदवारांनी प्राथमिक निवड करण्यात आली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. रोजगार मेळावा दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केला जातो. पात्र व  इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे लागते. दरमहा होणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ