तेल्हारा येथे जातवैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन शिबिर

 


अकोला,दि.३(जिमाका)- समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात आलेल्या सामाजिक समता पर्व अंतर्गत शुक्रवारी (दि.२८ एप्रिल) आयडीयल ॲकेडमी, तेल्हारा येथे जातवैधता प्रमाणपत्र बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. किरण निखाडे आणि सै.रफीक सै.हुसेन यांनी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करुन कागदपत्रसह जातपडताळणी अकोला या कार्यालयात जमा करावे .जेणेकरून प्रवेश घेताना अडचण येणार नाहीत.  आणि ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रृटी आहेत त्यांनी त्रृटीची तात्काळ पूर्तता करावी, असे आवाहन अकोला समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास  सचिन बदरखे जातपडताळणी कार्यालयाचे निलेश इंगळे,अंकुश वाकोडे आणि पातुर तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १०  वी आणि ११ वी  १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ