दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन


अकोला,दि.9(जिमाका)- केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या युआयडीएआय विभागाने नवे नियम जारी केले आहे. नियमानुसार दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अद्ययावत (अपडेट) करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले आहे. अद्यावत न केलेले आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तरी जिल्हातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            भारत सरकारने देशात एक विशेष आणि महत्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले आहे. या आधार कार्ड संदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या युआयडीएआय विभागाने नवे नियम जारी केले आहे. त्यानुसार आधारचे नवे व्हर्जन कार्यान्वित झाले असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्र संचालकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील 7 लाख 47 हजार नागरिकांचे आधार अद्ययावत (अपडेट) करावयाचे असून युआयडीएआय विभागाने ज्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आधारशी सलग्न आहेत त्यांना मोबाईल वर संदेश देखील पाठविले आहे. दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या आधार कार्डधारकांचा रहिवाशी पत्ता बदलला नसला तरी पुन्हा रहिवाशी पुरावे व ओळखपत्र सादर करून ग्राहकांना आधार कार्ड अद्ययावत करावे लागणार आहे.  तरी देखील बहुतांश नागरिकांनी त्यांचे आधार अद्ययावत (अपडेट) केले नसल्याने त्यांचे आधार क्रमांक युआयडीएआय विभागाकडून निलंबित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिक आधारशी संबधित इतर सेवांपासून वंचित राहू शकतात व आधार क्रमांक परत सुरु करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आधार अद्यावत करुन घ्यावे.

 यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) या एजन्सीमार्फत देशातील रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी आधार क्रमांक देण्यात येते. भारताचा रहिवासी स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी नाव नोंदणी करू शकतो. 2011 पासून या नोंदणीला देशभरात सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीला नागरिकांची प्राथमिक माहिती संबंधित ऑपरेटर कडून भरून घेतली मात्र यावेळी बहुतांश व्यक्तींकडून कुठलाही पुरावा मागण्यात आला नव्हता. 2013-14 पर्यंत हि प्रक्रिया अशाच सुरू होता. मात्र आता युआयडीएआयच्या नव्या नियमानुसार या दोन ते तीन वर्षातील आधार कार्ड धारकांना रहिवाशी पुराव्यात बदल किंवा तोच असला तरी नव्याने ओळखपत्र व रहिवासी पुरावा जोडून आधारची केवायसी करावी लागणार आहे. याबाबत सर्व केंद्र संचालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील कोणत्याही आधार केंद्रांवर आधारची KYC  ग्राहक करू शकतील. नागरिकांचे आधार कार्ड उपडेट (Aadhar KYC) करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध ठिकाणी आधार नोंदणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत. या शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आधार अद्ययावत (अपडेट) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

          

टिप्पण्या

  1. आधार कार्ड को लेकर सूचना एवं प्रौद्योगिकी मंत्रालय के यूआईडीएआई विभाग ने नया नियम जारी किया है।
    Aadhar Card Update

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ