विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणार कारवाई; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा


अकोला, दि.22(जिमाका)- परिवहन विभागाच्या निर्देशानुसार मोटार चालविणाऱ्या व मागे बसणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच व्यक्तींनी विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व मागे बसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात. यामुळे दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून ते  कायद्याने सक्तीचे आहे. त्यानुसार व्यक्तीने तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना, शाळा व महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोटार सायकल चालवितांना हेल्मेट परिधान करावे. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व मागे बसणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र मोटार वाहन 1988 च्या कलमानुसार  नुसार कारवाई केली जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे कलम 250 नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त रस्त्यांवर 50 सी.सी.पेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तीस मोटार वाहन कायद्यानुसार कलम 129 च्या तरतुदीनुसार अपवाद करण्यात आले आहे. तरी सर्व शासकीय व निमशासकीय  संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना  हेल्मेट परिधान करण्याचे सूचना द्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ