व्यवसाय शिक्षणाच्या प्रचारासाठी ‘स्किल ऑन व्हिल्स प्रदर्शन व्हॅन’ अकोल्यात


            अकोला, दि.15(जिमाका)- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र व लेंड अ हॅन्ड इंडिया पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना कृतीशील, व्यावसायिक शिक्षणाची माहिती व्हावी यासाठी मोबाईल व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. हा मोबाईल व्हॅन  मंगळवार दि. 16 मे 2023 रोजी जिल्हा परिषद, अकोला येथे येणार आहे. या मोबाईल व्हॅन प्रदर्शनीचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.

             स्किल ऑन व्हील्स प्रदर्शन व्हॅन ही चालती फिरती प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल, कृषी उद्यानिकी, आरोग्य यासह इतर व्यावसायिक कौशल्य शिक्षण इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच सुसज्ज व्हॅनच्या माध्यमातून प्रात्याक्षिकाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. स्किल प्रदर्शन व्हॅन सकाळी 10 ते 6 यावेळेत जि.प. अकोला येथे उपलब्ध असणार आहे. यावेळी  जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांचेसह जिल्हा परिषद मधील सर्व विभाग प्रमुख, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी,  शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेच सर्व प्राचार्य/मुख्याधापक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य उपस्थिती राहणार आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ