महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ; शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अकोला, दि. 30(जिमाका)- महाराष्ट्र राज्य इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
राबविण्यात येत आहे, या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
योजनेकरीता पात्रता : योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य व देशांतर्गत
अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपयांचे कर्ज दिल्या
जाईल. लाभार्थ्यांचे वय 17 ते 30 वयोगटातील असावा, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, इयत्ता बारावीमध्ये 60
टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी व अर्ज
करण्यासाठी इच्छुकांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क
साधावा,
असे आवाहन
करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा