मयत व्यक्तीच्या परिवारांला चार लाखाचा धनादेश सुपूर्त





अकोला, दि.15(जिमाका)-  समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादात हरिहर पेठ येथील विलास गायकवाड यांचे दुखद निधन झाले होते. त्याच्या परिवाराला मानवनिर्मित आपत्ती दंगलीमध्ये दुख:द निधन झाल्याने सानुग्रह मदत म्हणून चार लाख रुपयांची शासकीय मदत मंजुर झाली आहे. सानुग्रह मदतीचा धनादेश विधानपरिषद आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते मयत परिवारांला सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना