दोनवाडा व केळीवेळी येथील आपत्ती प्रतिसाद पथकाला बचाव साहित्याचे वितरण

अकोला, दि.२९(जिमाका)- मौजे दोनवाडा व मौजे केळीवेळी या गावांना नैसर्गिक आपत्ती कालावधीत उपयोगी पडणारे बचाव साहित्य वितरीत करण्यात आले. आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साहित्याचे वितरण करण्यात आले.

आ. सावरकर यांच्या हस्ते ४ सीटर बोट ,५ लाईफ जॅकेट ,४ लाईफ रिंग ,२०० फुट  रोप इत्‍यादी साहीत्‍य वितरीत करण्‍यात आले . उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे ,तहसिलदार सुनिल पाटील तसेच मौजे दोनवाडा व मौजे केळीवेळी सरपंच,पोलीस पाटील,तलाठी,ग्रामसेवक,व गावातील नागरीक उपस्थित होते.

००००० 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना