दस्तनोंदणी कार्यालय सुरु राहणार दर शनिवार, रविवारी

 


अकोला,दि.३(जिमाका)- जनतेच्या सोईसाठी दर शनिवार आणि रविवारी दस्त नोंदणी कार्यालये सुरु ठेण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२, अकोला क्रमांक २ हे कार्यालय दर शनिवार व रविवार सुरु राहणार आहे,असे सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी कळविले आहे. दर बुधवार व गुरुवारी हे कार्यालय बंद असेल असेही आदेश प्राप्त झाले आहेत. यासंदर्भातील अंमलबजावणी ही दि.२९ एप्रिल पासून सुरु झाली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी व जिल्ह्यातील जनतेस आपल्या व्यवहारांची दस्त नोंदणी प्रत्येक शनिवार व रविवारी करता येईल, असे मुद्रांक जिल्हाधिकारी तेलंग यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ