शिकाऊ उमेदवार परीक्षेबाबत आवाहन



                   अकोला,दि.22 (जिमाका)-  अकोला वाशिम जिल्ह्यातील औद्योगीक आस्थापनांमधुन  30 ऑक्टोबर 2019 पर्यंत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण  पुर्ण केलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा संबंधीत आस्थापनेमध्ये शनिवार दि.30 पर्यंत होणार आहे. तसेच थिअरी परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याबाबत वेळापत्रक प्राप्त झाले आहे. विस्तृत वेळापत्रकाची प्रत मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केन्द्र व्दारा औद्योगीक प्रशिक्षण संस्था अकोला येथे सुचना फलकावर उपलब्ध आहे.  शिकाऊ उमेदवारांना सोमवार दि.25  पर्यंत आपआपल्या  प्रोफाईल/बायोडाटा मध्ये दुरूस्ती करण्याची सोय  Apprentiship पोर्टल  वर उपलब्ध आहे. तसेच दि.16 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा अर्ज भरून  अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र  व्दारा औद्योगीक  प्रशिक्षण संस्था, अकोला या कार्यालयात सादर  करावी. अधिक मार्गदर्शनासाठी प्राचार्य,मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगीक प्रशिक्षण  संस्था, अकोला या कार्यालयास भेट द्यावी असे अंशकालिन प्राचार्य मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगीक प्रशिक्षण  संस्था, अकोला यांनी कळविले आहे.
                                                                        00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ