अति पावसाच्या स्थितीत करावयाचे रब्बी पिकांचे व्यवस्थापन


  अकोला, दि.१६(जिमाका)- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर रब्बी हंगामात  करावय्च्या पिक व्यवस्थापनाबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. पिक निहाय करावयाच्या व्यवस्थापनाच्या सुचना याप्रमाणे-
रब्बी ज्वारीः
१)ज्वारी पिवळसर झाली असल्यास पावसाचे साचलेले पाणी शेतातून बाहेर काढणे व पिकावर २ टक्के युरिया फवारणी करणे.
२)करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास  कॉपर ओएक्सिक्लोराईड चार ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)अमेरिकन लष्करी अळीचा  प्रादुर्भाव आढळल्यास  पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी पाच मि.लि.  प्रतिलिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) पाच मि.लि.  प्रति लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची  पाच ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका-
१)सध्या काढलेल्या कणसांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  चांगल्या प्रकारे वाळवून घ्यावीत.
२)मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा  प्रादुर्भाव आढळल्यास  पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी पाच मि.लि.  प्रतिलिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) पाच मि.लि.  प्रति लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची  पाच ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा-
 १)सततच्या पावसाने पाणी साठले आहे अशा ठिकाणी उगवण झाली नाही किंवा पिक उमळून आले आहे अशा ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल.  जेथे हरभऱ्याची उगवण झाली आहे.  अशा ठिकाणी पिक वाफशावर आल्यावर  कोळपणी करुन  दोन टक्के युरियाची फवारणी करावी.
२)हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास  पाच टक्क निंबोळी अर्काची  फवारणी पाच मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) पाच मि.लि.  प्रति लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी अथवा एच.एऽएन. पी.व्ही ५०० एल.ई. या जैविक विषाणूची १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऊस-
१)ऊस लागवडीच्या वेळी जमिनीत पावसाचे पाणी साचून  राहिले असल्यास चर खोदून  पाणी बाहेर काढावे, ऊस  लागवडीच्या वेळी ऊसाची टिपरे न वापरता ऊसाची रोपे लावावीत.
२)ऊस पडलेला किंवा कललेला असल्यास  दोन ओळीतील ऊस  एकमेकांना बांधून  आधार द्यावा.
३)ऊसाच्या सरीतील  पाणी ओसरताच ऊस पिकास ५० किलो  युरिया व ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर  याप्रमाणे बुस्टर डोस द्यावा.
४)ऊसास ठिबक सिंचन असेल तर  खतेही ठिबक द्वारे द्यावीत. वाफसा येताच ऊसाच्या बुडख्यास मातीची भर घालावी. मुख्य ऊसास जर फुटवे फुटले असतील तर ते काढून टाकावे.
कापूस-
१)पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास पाणी दंडाच्या सहाय्याने  बाहेर काढावे.
२)कपाशीची पाने लालसर झाली असतील तर नत्राची कमतरता असण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाढ़ीच्या  काळात दोन टक्के डीपीए खताची दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्या.
३)कापसावर अकस्मिक मर आढळून आल्यास  १.५ किलो युरिया+१.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. प्रति झाड द्यावे.
४)पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास  एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. प्रति हेक्टर अथवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही ८ मि. लि.  किंवा ५० ई.सी. ३० मि.लि प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर-
१)सध्या लवकर पक्व होणाऱ्या तुरीचे वाण शेंगांच्या अवस्थेत असून  आता झालेला पाऊस त्यास फायदेशीर आहे. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या अवस्थेतील वाणांसाठी सुद्धा आताचा पाऊस फायदेशीर आहे.
२)अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी मुळं कुजू नयेत म्हणून  पाणी शेतातून काढून टाकावे.
३)शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी पाच टक्के  निंबोळि अर्काची फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम), ५० मि.लि. किंवा एच.ए. एन.पी.व्ही. ५०० एल.ई. १० मि.लि.  किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही  १६ मि.लि.  किंवा एन्डोक्झाकार्ब १४.५ टक्के प्रवाही ७ मि.लि. किंवा फ्लूबॅंडामाईड २० टक्के दाणेदार पाच ग्रॅम किंवा क्लोरोन्त्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मि.लि.  या पैकी कोणतेही  एक किटकनाशक  फवारावे व गरज पडल्यास दुसरी फवारणी  पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
असे कृषि विभागाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ