नाफेडचे खरेदीकेंद्र सुरु; शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन


            अकोला, दि. 7 (जिमाका)-    किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात नाफेड मार्फत अकोला, अकोट, तेल्हारा, पातूर , वाडेगांव, पारस   व मुर्तिजापर येथे मुग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र  सुरु झाले आहेत. या खरेदी केंद्रावर मुग खरेदी सुरु झाले आहे.  तसेच शुक्रवार दि.8 पासून सर्व खरेदी केंद्रावर उडीद व सोयाबीनची खरेदी नाफेडकडून करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस प्राप्त झालेले आहेत.  अशा  शेतकऱ्यांनी आपला उडीद व सोयाबीन शेतमाल संबधीत  खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
            त्याअनुषंगाने दि.विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि. अकोला यांचे कडून अकोला, अकोट,  मुर्तिजापुर या  केंद्रावर उडीद व सोयाबीन विक्री करीता ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना गुरूवार (दि.7) रोजी एस.एम.एस.पाठविण्यात आलेले आहेत.    त्याचप्रमाणे  जिल्हा मार्केटींग अधिकारी, अकोला  यांचे कडून सुद्धा तेल्हारा, पातूर पारस व वाडेगांव या  केंद्रावर उडीद व सोयाबीन विक्री करीता ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना गुरूवार( दि.7 ) रोजी एस.एम.एस.पाठविण्यात आले आहेत.  नोंदणी झालेल्या व एस.एम.एस.पाठविलेल्या शेतकऱ्यांचा केंद्रनिहाय तपशिल पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र.
केंद्राचे नांव
उडीद विक्री करता ऑनलाईन
 नोंदणी केलेल्या
शेतकऱ्यांची संख्या
एस.एम.एस.पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या

सोयाबीन  विक्री करता
ऑनलाईन नोंदणी केलेल्या
शेतकऱ्यांची संख्या
एस.एम.एस.
पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या

1
अकोला
50
25
99
25
2
अकोट
266
66
561
50
3
मुर्तिजापुर
41
10
185
10
4
तेल्हारा
157
30
131
30
5
वाडेगांव
74
14
127
17
6
पारस
147
10
92
15
7
पातूर
14
10
56
10

एकूण
749
165
1251
157

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ