नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    अकोला, दि. 7 (जिमाका)-   भारतीय मौसम विभाग यांच्या संदेशानुसार  दि.  7 ते 8  दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपुर्णा व दगड पारवा हे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. तसेच मुर्तिजापूर तालुक्यातील पुर्णा नदीवर असलेले घुगसी बॅरेज 90.36 टक्के भरले असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे. तसेच पुर्णा नदीवर असलेल्या नेर धामना बॅरेज जलसंचय पातळी वाढविण्याचे काम सुरु असुन पुर्णा नदी पाणी पातळी वाढणार आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित रहावे असे निर्देश  प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ