शस्त्र परवानाधारकास शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध



अकोला,दि.22 (जिमाका)-   जिल्हा परिषद व पंचायत समिीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन निवडणूक प्रक्रीयेस  सुरूवातही झाली आहे. संपुर्ण निवडणूक कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारांचा  वापर करून जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्र धारकांना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. या संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असुन या आदेशाचा भंग करणा-या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम