सैनिकी शाळा चंद्रपुर अखिल भारतीय सैनिकी शाळेची प्रवेशपरिक्षा 5 जानेवारी रोजी


अकोला,दि.27(जिमाका)- सैनिकी शाळा चंद्रपुर करिता शैक्षणिक सत्र  2020-21 साठी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परिक्षा 5 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. ही परिक्षा चंद्रपूर, नागपूर, अमरावती , नांदेड, औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे.  यासाठी 2 डिसेंबर  रोजी ॲडमिट कार्ड (प्रवेशपत्र) पाठविण्यात येणार आहे. या परिक्षेचा निकाल 3 ते 5 फेब्रूवारी 2020 दरम्यान प्रसिद्ध होणार आहे.  त्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी 20  फेब्रूवारी ते 10 मार्च  2020 दरम्यान घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.sainikschoolchandrapur.com या वेबसाईटवर संपर्क साधावा , असे सैनिकी शाळा चंद्रपुरचे प्राचार्य स्क्वार्डन लेफ्टनंट महेशकुमार यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ