ठेलारी जमातीच्या भ.ज. (क) समावेश जनसुनावणीसाठी सुचना, हरकती मागविल्या


अकोला, दि.5 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांच्याकडे ठेलारी (भटक्या जमाती -ब)या जमातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अ.क्र.29 धनगर ची तत्सम म्हणून (भटक्या जमाती -) समावेश करण्याबाबत बुधवार (दि. 13) रोजी सकाळी 11 ते  सायं. 5 यावेळे नवीन नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे जनसुनावणी होणार आहे. तरी ज्या संस्था,संघटना , व्यक्ती यांना काही निवेदन, हरकती व सुचना लेखी स्वरूपात  मांडावयाच्या असतील त्यांनी आपली लेखी  निवेदने , हरकती , सुचना सादर कराव्यात.या जनसुनावणीकरीता  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे  सदस्य डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. भुषण कर्डीले, डॉ. राजाभाऊ करपे, सदस्य सचिव डी.डी. देशमुख उपस्थित राहणार आहे,असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी.डी. देशमुख यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ