जागो ग्राहक जागो या मोहिमेतर्गंत जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न



      अकोला,दि.27 (जिमाका)-  जागो ग्राहक जागो या मोहिमेतर्गंत अशासकीय सदस्य व अधिकारी यांचे एक दिवसीय  प्रशिक्षण बुधवार (दि. 27 ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संपन्न झाले. यावेळी  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती एस.एम उंटवाले,  नॅशनल कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनाएझेशन चे अध्यक्ष संजय पाठक,  जिल्हा पुरवठाअधिकारी बबनराव काळे , निरीक्षक अधिकारी अमोल पळसपगार , येन्नावार, सहाय्यक लेखा अधिकारी दिनकर बोरूळकर, अशासकीय सदस्य श्रीराम ठोसर, सुधाकर पाठक , सुनिल नारखेडे, अनिल कोल्हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती एस.एम उंटवाले यांनी दिप प्रजल्वन करूनप्रशिक्षणाची सुरूवात केली.  ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार राज्य व  जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये ग्राहकांना येणा-या अडचणीचे निराकरण व रेरॉ कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.  जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी अन्न सुरक्षा कायदा , इ पॉस मशिन , भेसळी व वस्तुचा दर्जा ठरविण्यसाठी उपलब्ध असलेल्या  प्रयोग शाळेची  व त्याच्या कार्याची माहिती  दिली. संजय पाठक    आळशी यांनी वस्तु व सेवा खरेदी मध्ये  ग्राहकांची होणारी फसवणूक , ग्राहकांचे हक्क या बाबत सविस्तर  माहिती दिली.  उपस्थितांचे आभार जिल्हा पुरवठा कार्यालयाचे  डोंगरे यांनी मानले.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ