जलपुरस्कार २०१९ साठी ऑनलाईन प्रस्ताव मागविले


अकोला,दि.२१(जिमाका)- जलसंसाधन, नदी विकास व गंगा पुनर्जिवन विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत देण्यात येणाऱ्या  व्दितीय राष्ट्रीय जलपुरस्कार-२०१९ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जलस्त्रोत बळकटीकरण, निर्मिती, वाप्र, जनजागृती याक्षेत्रात जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांनी आपले ऑनलाईन प्रस्ताव शनिवार दि.३० पर्यंत केंद्रशासनाच्या वेबसाईटवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यात एकुण १३ घटकानुसार पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे नुतनीकरण व नवीन जलस्त्रोतांची निर्मिती करुन जतन करणे,जलस्त्रोतांचा वापर व जलस्त्रोताबाबत जनजागृती या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
                         या पुरस्काराकरीता केंद्र शासनाच्या www.cgwb.gov.in/www.mygov.in   संकेतस्थळावरील मार्गदर्शक सुचनांनुसार उत्कृष्ट जिल्हा, ग्रामपंचायत, नगरपालीका/महानगरपालीका, शाळा/महाविद्यालय, वैयक्तीक/संस्था, निवासी कल्या संस्था व उद्योग करीता प्रथम (दोन लाख रुपये), व्दितीय (दीड लाख रुपये) व तृतीय (एक लाख रुपये) पुरस्कार देण्यात येतील. जिल्ह्यातील या क्षेत्रातील इच्छुक संस्थांनी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करुन परस्पर शनिवार दि. ३० पर्यंत संकेतस्थळावर केंद्र शासनास पाठवावे व प्रस्तावाची एक प्रत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, अकोला येथे सादर करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ