जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्विकारणेबाबत


अकोला,दि.29 (जिमाका)-  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्यात यावा. यासाठी संबंधितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था.पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in अथवा ऑफ लाईन पध्दतीने विहित नमुन्यात  भरावा. अर्जासोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन 2012. नियम 14 नुसार, निवडणूक प्रयोजनार्थ नमुना नं.3 व नमुना नं.21 मध्ये विहित केल्यानुसार शपथपत्र सादर करावे.
तसेच नियम 16 नुसार जाती प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह जात प्रमाणपत्राची मुळ प्रत, प्राथमिक शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या किंवा इतर शाळा किंवा महाविदयालय सोडल्याच्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत.
नातेवाईकांच्या प्राथमिक शाळा सोडल्याच्या किंवा महाविदयालय सोडल्याच्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत.
,अशिक्षित व्यक्ती, अशिक्षित पालक किंवा नातेवाईक यांचेबाबतीत ज्यामध्ये वंशावळीनुसार कुटुंबातील सदस्यांची म्हणजेच पणजोबा किंवा आजोबा किंवा वडील किंवा सख्खे काका यांची जात नमुद केली आहे. जन्म/मृत्यू नोंदवहीचा सक्षम प्राधिकाऱ्यांने निर्गमित केलेला उतारा (ग्राम नोंदवही क्र.14/कोतवार पुस्तक/राष्ट्रीयत्व नोंदवही),उपलब्ध असल्यास, ज्यामध्ये जात नमुद केली आहे अशा जुन्या महसुली दस्तएैवजांच्या प्रमाणित प्रती, अनुज्ञेयतेच्या अधीन राहून इतर संबंधित पुरावा असल्यास, नियम 2 च्या खंड (ड) मध्ये विनिर्दिष्ट केलेले मानीव दिनांक लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यातील कायम निवासाचा पुरावा.उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदारांचे नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र आदि दस्तएैवज/पुरावे सादर करण्यात यावे.
या कागदपत्रासह, शपथपत्र व परिपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्जासह संबंधीत निवडणूक अधिकारी यांचे शिफारशीसह प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात संबंधीत अर्जदाराने समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रात दाखल करण्यात यावा. अर्ज स्विकारतांना शासनाने विहित केलेले शुल्क रुपये 500/- ची आकारणी केली जाईव व प्रस्ताव स्विकारल्याची पावती अर्जदार यांना समक्ष देण्यात येईल. असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी  समितीचे अरविंद वळवी यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ