जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि.२१(जिमाका)- जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून निवडणूक आचार संहिता लागू झालेली आहे. ही निवडणूक निर्भय व निष्पक्ष  वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
 यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस उपविभागीय अधिकारी एस.एल. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की,  राज्‍य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार अकोला जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूका करीता प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.  सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केल्‍यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत संबंधीत क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहील.
अकोला जिल्‍हा परिषद व पंचायत समितीमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची संख्‍या
अ.क्र.
तालुक्‍याचे नांव
निवडणूक विभागाची संख्‍या
निर्वाचन गणाची संख्‍या
1
तेल्‍हारा
8
16
2
अकोट
8
16
3
मुर्तिजापूर
7
14
4
अकोला
10
20
5
बाळापूर
7
14
6
बार्शिटाकळी
7
14
7
पातूर
6
12

एकूण
53
106
अकोला जिल्‍हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण
जिल्‍हा परिषद अकोला
निवडणूक विभागाची संख्‍या
अनु. जाती
अनु. जाती स्‍त्री
अनु. जमाती
अनु. जमाती स्‍त्री
नामाप्र
नामाप्रस्‍त्री
सर्वसाधारण
सर्वसाधरण स्‍त्री
५३
6
6
2
3
7
7
11
11

·        निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची संख्‍या वतालुका निहाय मतदार संख्‍या
अ.क्र.
तालुक्‍याचे नांव
निवडणूक विभागाची संख्‍या
निर्वाचन गणाची संख्‍या
स्‍त्री
पुरुष
इतर
एकूण
1
तेल्‍हारा
8
16
53418
60958
0
114376
2
अकोट
8
16
62400
68510
0
130910
3
मुर्तिजापूर
7
14
58059
62152
0
120211
4
अकोला
10
20
88375
82106
0
170481
5
बाळापूर
7
14
55191
60058
0
115249
6
बार्शिटाकळी
7
14
53250
55370
1
108621
7
पातूर
9
12
41059
45150
0
86209

एकूण
53
106
411752
434304
1
846057
जिल्ह्यात एकुण मतदान केंद्रांची संख्‍या  १०१७ एवढी आहे.
मतदान यंत्र उपलब्धता-
मतदान केंद्र संख्‍या
मतदान यंत्र
आवश्‍यकयंत्र
25 टक्‍के
एकूण
उपलब्‍धता
1017
कंट्रोल युनिट
1017
250
1270
744
बॅलट युनिट
2034
508
2542
796
मेमरी
1017
250
1270
500

मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्‍यक्ष व अधिकारी उपलब्धता-
अधिकारी/कर्मचारी
मतदान केंद्राची संख्‍या
आवश्‍यक अधिकारी/ कर्मचारी
अधिक १० टक्‍के
एकूण
केंद्राध्‍यक्ष
1017
1017
101
1118
मतदान अधिकारी -३
3051
305
3356
शिपाई / कोलवाल
1017
101
1118
पोलीस शिपाई
1017
101
1118
एकूण
6102
608
6710
नामनिर्देशन पत्र, शपथपत्र, इतर कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्‍याची सुविधा-
राज्‍य निवडणूक आयोगाकडून तयार करण्‍यात आलेल्‍या संगणकीय प्रणालीतूनच उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्र
व शपथपत्र भरणे आवश्‍यक आहे.
१.      नामनिर्देशनपत्र
२.     मत्‍ता व दायित्‍व तसेच गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीबाबतचे शपथपत्र
राज्‍य निवडणूक आयोगाने पहिल्‍या दोन बाबींकरिता म्‍हणजेच उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र सहजरितीने भरता यावे यासाठी महाऑनलाईनच्‍या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्‍य उमेदवारांनी सॉफ्टवेअरव्‍दारे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरणे आवश्‍यक आहे. त्‍यांनी  
http//panchayatetelection.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर जाऊन त्‍यामध्‍ये स्‍वतःची नोंदणी करुन घ्‍यावी व नामनिर्देशनपत्रामध्‍ये तसेच शपथपत्रामध्‍ये माहिती भरावी. त्‍याचे प्रिंटआऊट काढून तयावर स्‍वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावे. अशाप्रकारे भरलेला व स्‍वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्‍हणून ग्राह्य धरण्‍यात येईल. सर्व उमेदवरांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र इ. भरण्‍यात अडचण येऊ नये म्‍हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्‍यकते प्रमाणे एक किंवा त्‍यापेक्षा जास्‍त मदत कक्षांची स्‍थापना करणे बाबत निर्देश दिले आहेत.
आचारसं‍हितेची प्रभावी अंमलबजावणी-
जि.प. पं. समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूका असल्‍याने संपूर्ण जिल्ह्यात (महानगर पालिका, नगरपालिका क्षेत्र वगळून) निवडणूक आदर्श आचार संहिता लागू राहील,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेचा कालावधी मा. राज्‍य निवडणूक आयोग ज्‍यावेळी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करेल त्‍यावेळेपासून आचारसंहिता लागू होईल व निवडणूकीचा निकाल जाहिर होई पर्यत अंमलात राहील.आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी मा. अप्‍पर जिल्‍हाधिकारी यांचे नेतृत्‍वात  पथक जिल्‍हास्‍तरावर गठीत करण्‍यात आले आहे. तसेच तालुकास्‍तरावर सुद्धा स्‍वतंत्र पथक गठीत करण्‍यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात व्‍हीडीयो ग्राफी सर्व्हिलन्‍स पथक,.२ भरारी पथक,२१ चेक पोस्‍टसाठी पथक  तर ७ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत,अशीही माहिती  यावेळी देण्यात आली.
०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ