अल्पसंख्याक संस्था पायाभुत सुविधा निर्मिती अनुदान मागणीचे प्रस्ताव 30 तारखेपर्यंत मागविले



अकोला, दि.13 (जिमाका)-  धार्मिक अल्पसंख्याक  विद्यार्थी बहुल शासन मान्य  खाजगी अनुदानित /विना अनुदानित / कायम  विना अनुदानित शाळा , कनिष्ठ  महाविद्यालये,  औद्योगीक प्रशिक्षण  संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा  व अपंग  शाळामध्ये पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2019-20 अंतर्गत  अनुदान मागणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी संबंधित संस्थांनी परिपुर्ण प्रस्ताव  जिल्हाधिकारी कार्यालयास  शनिवार दि.30पर्यंत मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव देऊ नये, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन