सहकारी संस्था निवडणुकाः तज्ज्ञ मंडळ नियुक्तीसाठी अर्ज मागविले


अकोला, दि. (जिमाका)-  राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. ११ ऑक्टोबरच्या पत्रानुसार  सहकारी संस्थाच्या व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका या प्राधिकरणामार्फत व महाराष्ट्र  सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१ महाराष्ट्र  सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ व महाराष्ट्र  कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ मधील तरतुदीनुसार पार  पाडण्यात येतात. या  निवडणूका पार पाडतांना क्षेत्रिय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी बाबत विचार मंथन करणे व सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ मंडळाचे गठण करण्याबाबत निवडणूक प्राधिकरण विचार करीत आहे.  त्यासाठी तज्ज्ञ अधिकारी/पदाधिकारी, फेडरेशनचे प्रतिनिधी किंवा सुप्रसिद्ध विधिज्ञ यांची नावे कळवायची आहेत. तसेच मंडळामध्ये स्वयंस्फुर्तीने भाग घेण्यासाठी  संबंधित तज्ज्ञ हे इच्छुक असणे आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अशासकीय  सदस्यांना  प्राधिकरणातर्फे कोणताही प्रवास  व दैनिक भत्ता अनुज्ञेय नाही याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी.  तरी या तज्ज्ञ मंडळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तिंनी आपले कार्य परिचय व संमती पत्र  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयास येत्या सात दिवसात  व दोन प्रतित द्यावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ