जिल्हा वार्षिक योजना; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


अकोला,दि.२१ (जिमाका)- जिल्हा वार्षिक  योजना सन २०२०-२१  साठी प्राप्त प्रस्ताव   तसेच सन २०१९-२०अंतर्गत झालेल्या खर्चाचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी जिल्हा नियोजन सभागृहात  घेतला.
         यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी  डी. व्ही. आंबेकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येवलीकर, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, तसेच सर्व विभागप्रमुख व कार्यान्वयन यंत्रणा  प्रमुख उपस्थित होते.
         सन २०२०-२१ साठीचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभाग निहाय यंत्रणाकडुन मागविण्यात आलेल्या प्रस्तावांवर  चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण , अनुसुचित जाती उपयोजना ,आदिवासी उपयोजना बाह्य या  सर्व योजनांचा विभाग व लेखाशीर्ष  निहाय आढावा घेण्यात आला.
         सद्यस्थितीत असलेली निवडणुक आचारसंहिता  व करावयाच्या  कामांना लागणारा वेळ याचा समन्वय  साधुन सर्व विभागांनी  आपापली कामे पुर्ण करून विहित  वेळेत निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी यंत्रणा प्रमुखांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ