अकोला येथे शनिवारी रोजगार मेळावा;पाच कंपन्यांमधील २५० हून अधिक पदांसाठी होणार भरती प्रक्रिया


अकोला, दि.१४ (जिमाका)-  जिल्हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला तसेच  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था(मुलांची) यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवार दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (मुलांची) ,रतनलाल प्‍लॉट ,नविन बस स्‍टॅण्‍ड चे मागे , अकोला,येथे आयोजित करण्‍यात आला आहे,अशी माहिती सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांनी दिली आहे.
            या मेळाव्‍यामध्‍ये सहभागी उद्योग व त्यांना आवश्यक असलेली मनुष्यबळ आवश्यकता याप्रमाणे-
१.एन.डि.जेम्‍स प्रा.लिमी. बल्‍लारपुर जि.चंद्रपुर(एकुण  १४ पदे कोणत्‍याही शाखेतील पदवीत्‍तर पदवी /पदवी / संगणक ज्ञान असलेले .
२. मेटलमन ऑटो प्रा. लिमी. /बडवे इंजिनियरींग /सब्रोस प्रा. लिमी. औरंगाबाद व पुणे करीता ( एकुण १७५ पदे आय.टी.आय.पास कोणताही ट्रेड )
३. मॉर्डन सेक्‍युरीटी सर्व्हिस प्रा.लिमी. हैद्राबाद ( एकुण पदे ५० किमान दहावी / बारावी तसेच बेसीक इंग्रजी येणे आवश्‍यक)
४. व्‍हेरॉक प्रा.लिमी. औरंगाबाद (एकुण पदे ५० आय.टी.आय.पास कोणताही ट्रेड )
५. धुत ट्रान्‍समिशन प्रा.लिमी. औरंगाबाद (एकुण पदे ५० फक्‍त महिलांकरीता आय.टी.आय.पास कोणताही ट्रेड )
 या मेळाव्यात या पाच कंपन्यांचा सहभाग राहील. तसेच सुमारे २५० विविध पदांसाठी  या रोजगार मेळाव्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. यावेळी पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्‍या मुलाखती घेण्‍यात येतील व त्‍याच दिवशी निवड करण्‍यात येईल.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नाव  नोंदणी केलेल्‍या दहावी/ बारावी / पदवी / आयटीआय पास / पदव्युत्‍तर पुरुष तसेच  महिला  उमेदवारांना यात सहभागी होऊन रोजगार प्राप्‍त करण्‍याची संधी उपलब्‍ध झाली आहे .
            पात्र उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणिक पात्रतेची सर्व मुळ प्रमाणपत्र (सत्‍य प्रतिलिपी) नुकतीच काढलेली पासपोर्ट आकाराची छायाचित्रे व सेवायोजन कार्डासह शनिवार दि.१६रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था मुलांची ,रतनलाल प्‍लॉट ,नविन बस स्‍टॅण्‍ड चे मागे , अकोला. येथे  उपस्थित राहावे असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोलाचे सहायक संचालक सु.रा.झळके यांनी केले आहे.
०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ