जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न


        अकोला,दि.27 (जिमाका)-  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम , अकोला अंतर्गत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांची दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा प्रशिक्षण  केंद्र अकोला येथे दि. 25 व 26 रोजी  करण्यात आले होते.
            या प्रशिक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, गा्रमीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय,  जिल्हा स्त्री रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी या  प्रशिक्षणाकरीता  उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  राजकुमार चौव्हाण व जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरी पवार यांनी केले. प्रशिक्षणाकरीता  प्रशिक्षक  म्हणुन मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत वानखडे यांनी मार्गदर्शन केले . प्रशिक्षण  यशस्वी होण्याकरीता प्रदिप इंगोले, अशोक जाधव, सय्यद आरीफ, ज्योती  सोनाग्रे,  प्रतिभा तीवाणे, सिमा मसराम,  रिना चोंडकर, पी.एस. देशमुख  यांनी परिश्रम घेतले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ