माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर अनंतात विलीन ;शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


        अकोला, दि.६(जिमाका)- माजी मंत्री केशवराव नारायणराव उर्फ बाबासाहेब धाबेकर यांचे मुंबई येथे मंगळवार दि.५ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.६) दुपारी त्यांच्या मूळ गावी धाबा ता. बार्शीटाकळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
            यावेळी शासनाच्या वतीने पोलीसदलाद्वारे मानवंदना देण्यात आली. शासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी व  जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर हरीश पिंपळे ,सह विविध पक्षाचे आजी-माजी मंत्री व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या पार्थिवला त्यांचे ज्येष्ठ पुत्र सुनिल धाबेकर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी हजारोच्या संख्येने त्यांचे चाहते, आप्तेष्ट साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ