केंद्रीय पथकाव्दारे पिक नुकसानीची पाहणी




अकोला, दि.23(जिमाका) –राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पिक हातचे गेले. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी  केंद्रीय कृषी विभागाच्या पाहणी पथकाव्दारे आज(दि.२३) रोजी जिल्ह्यातील अकोला आणि बाळापूर या तालुक्यातील गावांमधील पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद  साधून नुकसानीचा आढावा घेतला. 
या पाहणी पथकाचे  प्रमुख केंद्र शासनाचे  आर.पी.सिंग व त्यांच्यासोबत  विभागीय आयुक्त पियुष सिंग,अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोनकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ  , उप विभागीय अधिकारी नीलेश अपार,तहसीलदार विजय लोखंडे,पुरुषोत्तम भुसारी यांच्यासह इतर संबधिंत अधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. 
यावेळी त्यांनी अकोला तालुक्यातील म्हैसपूर येथून नुकसानग्रस्त  भागाच्या पाहणीस सुरवात केली. येथील गजानन अडकने यांच्या  शेतातील ज्वारी व कपाशी पिकाचे पूर्णत:  नुकसान झालेले असून पथक प्रमुखांनी त्या शेतात  पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने त्यांच्या समस्या , झालेले एकंदरीत नुकसान याबाबत माहिती जाणून घेतली. 
 पुढे कापशी तलाव गावातील  पिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. या गावातील गणेश चतरकर या शेतकऱ्याने सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतातील उभे पिक हातचे गेले आहे. अशा भावना यावेळी शेतकरी गणेश चतरकर यांनी व्यक्त केल्या. गोरेगाव खुर्द येथील शशिकांत खंडारे यांच्यासह या भागातील शेतीतील सोयाबिन पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी पथक पाहणीत दिसून आले. खंडारे यांच्या शेतातील सोयाबीन पुर्णपने खराब झाले असून खर्च निघत नसल्याने त्यांनी शेतातील सोयाबीन काढले नसल्याचे निदर्शनास आले.
            पथकाने बाळापूर तालुक्यातिल भरतपुर येथिल दिनकर ताले यांच्या ,प्रवीण सदांशिव तसेच नकाशी येथील रामकृष्ण तायड़े व जयश्री सोनवणे यांच्या शेतीची पाहणी केली.                             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ