पदाच्या निगडीत असलेल्या कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करावे -अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा






           अकोला,दि.26 (जिमाका)-  शासनाच्या सेवेत असलेल्‌या प्रत्येक कर्मचारी व अधिका-यांनी आपल्या पदाशी निगडीत असलेल्या कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले. आज  मंगळवार (दि.26) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संविधान दिनानिमित्य  भारताचे संविधान उद्देशिकेचे  वाचन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नायब तहसिलदार सतिश काळे, संजय ढवळे  तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी तसेच सर्व नागरीकांना  संविधानाची ओळख व्हावी याकरीता  राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन  म्हणून साजरा करण्यात  येतो. भारतीय संविधान  अंगीकृत आणि अधिनियमीत करून   स्वत:हा प्रत  अर्पण करण्याच्या घटनेला  यावर्षी 70 वर्ष पुर्ण होत आहे.  त्या अनुषंगाने भारतीय संविधानातील  नागरीकांचे   मुलभूत कर्तव्य  नागरीकांना  माहिती व्हावे यासाठी  26 नोव्हेंबर  2019 ते 26 नोव्हेंबर 2020  या कालावधीत जागरुकता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत पुढील वर्षभर विविध विभागांच्या मार्फत  जागरूकतेचे  कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ