बालदिनानिमित्त बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती



अकोला,दि.१४ (जिमाका)- येथील सावित्रीबाई  फुले जि. . कन्या शाळा आगरकर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त बालकामगार प्रथाविरोधी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यककामगार आयुक्त राजू गुल्हाणे यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला.        
            या कार्यक्रमास जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश जवादे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती करुणा महंतारे,जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण समन्वयक आरती जाधव, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विस्तार अधिकारी विनोद मानकर, जिल्हा बाल सहायता कक्ष सुनिल सरकटे, मुख्याध्यापक वाल्मिक भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात  पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करुन करण्यात आली. यावेळी बोलतांना गुल्हाणे म्हणाले की, विपरित परिस्थितीत कोवळे बालपण हिरावते, शिक्षणापासुन वंचित राहून घरच्या परीस्थितीवर मात करण्यासाठी बाल कामगार जन्माला येतात. ती परीस्थिती, बाल कामगार ही संज्ञा शिक्षण घेवून मोडीस काढता येऊ शकते. यासाठी शासनावर अवलंबून राहता प्रत्येकाने जागरूकतेने जबाबदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ