सोमवारपासून मातृवंदना सप्ताह


अकोला,दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये येत्या सोमवारी म्हणजेच दोन ते आठ डिसेंबर पर्यंत मातृवंदना सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मातृवंदना  योजनेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२ पासून या सप्ताहास प्रारंभ होत आहे.
‘सुपोषित जननी  विकसित धारिणी’ हे घोषवाक्य  या सप्ताहात असणार आहे. याबाबत सप्ताहभर जनजागृती करण्यात येणार असून  आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नवीन पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरुन घेतील.  लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बॅंक खाते काढणे या साठी विशेष शिबिर आयोजित केले जातील. आरोग्य पोषण, स्वच्छता याबाबत तज्ज्ञांचे व्याख्याने आयोजित करणे,  करेक्शन क्यु कमी करण्या करीता विशेष मोहिम, दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याकरीता पात्र लाभार्थींना त्वरीत लाभ देण्याची प्रक्रिया इ. उपक्रम राबविण्यात येणार आहे,असे  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ