‘महाडिबीटी’शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 15 पर्यंत मुदतवाढ

अकोला, दि.6 (जिमाका)-  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विद्यार्थ्यांना थेट बॅंक खात्यात शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी ‘ महाडिबीटी’ या पोर्टलवरुन अर्ज करावा लागतो. हा अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख  शुक्रवार दि. 15 पर्यंत शासनाने मुदत  वाढविली आहे, असे सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.
सन 2018-2019  या शैक्षणिक सत्रापासुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत व इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग  विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग  कल्याण विभागामार्फत   राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर  शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने व व्यावसायिक अभ्यास क्रमाशी सलंग्न वसतिगृह निवार्ह भत्ता इत्यादी योजना ह्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या महाडीबीटी या  पोर्टलव्दारे  राबविण्यात येत आहेत.
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये सदर पोर्टलवर विद्यार्थ्यांकरीता अर्ज भरण्याची अंतिम तारीख  शुक्रवार दि. 15 पर्यंत शासनाने वाढविली आहे.  तरी विदयार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिताचे अर्ज पोर्टलवर भरून रितसर आपल्या महाविद्यालयाकडे सादर करावे. महाविद्यालयांनी विदयार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ