बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियानास प्रारंभ


       अकोला, दि. 7 (जिमाका)-   बालकामगार प्रथे विरोधात  राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानास आज प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते   प्रारंभ करण्यात आला. या अभियानात महिनाभर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
       बालकामगार प्रथे विरोधात आजपासुन  ते 7 डिसेंबर पर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.  आज जिल्हाधिकारी कार्यालयातील  लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या अभियानासाठी  तयार करण्यात आलेल्या  जनजागृतीपर पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी  सहायक कामगार आयुक्त राजेश गुल्हाने, पोलीस उपअधिक्षक  एस.एल. पाटील,  जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक निलेश निकम, औद्योगीक सुरक्षा  विभागाचे राठोड,  शिक्षणाधिकारी प्राथमिक  वैशालीढग यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.  विविध विभागांचे विभागप्रमुख  उपस्थित होते.
                   यावेळी आढावा घेण्यात येऊन महिनाभर राबवावयाच्या उपक्रमांची माहिती संबंधीत विभागांना देण्यात आली.
       या अभियानात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातील बालकामगार बहुल क्षेत्र निर्धारित करुन तपासणी करणे, संबंधित मालकांकडून बालकामगार कामास न ठेवण्याबाबत  हमीपत्र घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनच्या बैठकांमध्ये  तसेच व्यापारी संघटनांचे चर्चासत्र घेऊन जनजागृती करणे,  महामार्गावरील विविध ढाब्यांची तपासणी करणे, सामुहिक शपथ घेणे, जनजागृतीपर स्पर्धा घेणे, प्रचार प्रसिद्धी करणे आदी  उपक्रमाचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ